संपादक:- विष्णू चव्हाण
*नवी दिल्ली – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सकाळी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत कोर्टाकडून कुठला तरी निकाल अपेक्षित होता. मात्र सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबतही आजच निवडणूक आयोगामध्येही सुनावणी होणार आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्हं धनुष्यबाण कोणाला मिळणार? या संदर्भात निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. दरम्यान, सुनावणीपूर्वी ठाकरे गटाचे वकील जैन यांनी मोठा दावा केला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.*
*👉🅾️👉आज माध्यमांशी बोलताना जैन म्हणाले, आम्ही आधीपासूनच सांगत आलेलो आहे, की उद्धव ठाकरे यांची बाजू भक्कम आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे २२ लाख २४ हजार प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. तर शिंदे यांच्या गटाकडून केवळ ४ लाख ५१ हजार प्रतिज्ञापत्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे प्रतिज्ञापत्रांची संख्या लक्षात घेता धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाला मिळण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटाकडून सामान्य शिवसैनिकांपासून ते नेत्यांपर्यंतची प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली आहे. तर विरोधी शिंदे गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या संख्येवरून निवडणूक आयोग आमच्याच बाजूने निकाल देणार, असा दावाही जैन यांनी केला.*