संपादक:-विष्णू चव्हाण
*नवी दिल्ली – देशभरात आज मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर भारतीय लष्कराचे सामर्थ्य पाहायला मिळले . यावेळी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमान राफेलच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. या चित्तथरारक प्रात्यक्षिकांचा व्हिडीओ संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ए. के. भारतभूषण बाबू यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे.*
ए. के. भारतभूषण बाबू यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राफेल फायटर जेट आकाशात काही क्षणात गिरकी घेताना दिसते. या व्हिडिओमधील लढाऊ विमान राफेलची क्षमता शत्रूला धडकी भरवणारी असल्याचे जाणवते. राफेलच्या आत आणि बाहेर बसवलेल्या कॅमेऱ्यांमधून या चित्तथरारक व्हिडीओमध्ये दृश्य थक्क करणारी आहेत.
*भारतीय हवाई दलाचे ताकद वाढविणारे Rafale Fighter Jet*
राफेल लढाऊ विमाने अंबाला आणि हसीमारा एअरफोर्स स्टेशनवर तैनात आहेत. पाकिस्तान आणि चीन या दोघांचा एकचवेळी सामना करता यावा यासाठी ती सज्ज आहेत. यामुळे चीन लगतच्या लडाख आणि पाकिस्तानच्या सीमांवर लक्ष ठेवणे अधिक सोपे होणार आहे. तसेच राफेलमुळे भारतीय हवाई दलास संपूर्ण ईशान्येकडील चीनच्या प्रत्येक कृत्यावर नजर ठेवणे शक्य होणार आहे. राफेलची मल्टीरोल कॉम्बॅट सिस्टीम दुर्गम भागातही शत्रूला टिपण्यास सक्षम अशी आहे.
#Vijay formation comprising of a single Rafale multirole fighter.@rajnathsingh@AjaybhattBJP4UK@giridhararamane@IAF_MCC @PIB_India @indianrdc pic.twitter.com/m8Pwy6SdCS
— A. Bharat Bhushan Babu (@SpokespersonMoD) January 26, 2023