संपादक:- विष्णू चव्हाण
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहिलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे गुरुवारी राजभवन येथे निरोप देण्यात आला. शुक्रवार 17 फेब्रुवारी रोजी राज्यपाल कोश्यारी यांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात येणार असून त्यानंतर ते देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत.आज शुक्रवार दि. 17 फेब्रुवारी रोजी राज्यपाल कोश्यारी यांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात येणार असून त्यानंतर ते देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत.सव्वातीन वर्षांची वादग्रस्त कारकीर्द असलेले भगतसिंह कोश्यारी यांना हटवून महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.रमेश बैस आज शुक्रवार दि.17 फेब्रुवारी रोजी ते महाराष्ट्रात येतील आणि 18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतील. त्यांचा शपथविधी दुपारी 12.40 वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार आहे.*
*महाराष्ट्रात येण्याआधी झारखंड सरकारकडून त्यांना निरोप देण्यात आला. बैस यांची राज्यपाल म्हणून या आधीची कारकीर्दही कोश्यारींसारखीच वादग्रस्त आहे. झारखंडमध्ये राज्य सरकारशी संघर्ष करणारे बैस राज्यपाल म्हणून महाराष्ट्रात काय भूमिका घेणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.*
*👉🟥🟥👉नव्या राज्यपालांचे आधीचे कारनामे*
*झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस या दोन पक्षांचे हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. याच सरकारमध्ये आणि राज्यपाल असताना बैस यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता.रमेश बैस यांनी झारखंड विधानसभेत संमत केलेलं झारखंड वित्त विधेयक 2022 परत पाठवले होते. सुधारणा करण्याच्या सूचना देऊन तीन वेळा त्यांनी हे विधेयक परत पाठवले होते.झारखंड विधानसभेत सरकारने मंजूर केलेली विधेयके परत करण्याचा बैस यांनी विक्रम केला आहे. मॉब लिंचिंग विरोधी विधेयक, कृषी मंडी विधेयकासह तब्बल 9 विधेयके त्यांनी परत केली आहेत.कायदा आणि सुव्यवस्था बिघडणे यांसारख्या विविध प्रसंगी त्यांनी सरकारच्या कामात हस्तक्षेप केल्याची चर्चा होती. विविध विभागांच्या आढावा बैठकांमध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले होते.झारखंडमध्ये आदिवासी सल्लागार परिषद स्थापन करण्याबाबत राज्य सरकारने केलेल्या नियमांवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ही नियमावली घटनात्मक तरतुदींच्या विरोधात आणि राज्यपालांच्या अधिकारांवर अतिक्रमण असल्याची तक्रार त्यांनी केंद्राकडे केली होती.*
*👉🅾️🅾️👉रमेश बैस यांचा संपूर्ण परिचय…*
– 2 ऑगस्ट 1947 रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे जन्मलेले रमेश बैस यांचे शिक्षण रायपूर येथे झाले.
– 1978 साली ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.
1980 ते 1985 या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले.
1982ते 1988 या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्री देखील होते.
1989 साली बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.
1998 साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रमेश बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.
1999 ते 2004 या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले.
2003 साली बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला व त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते.
आपल्या प्रदीर्घ संसदीय जीवनात बैस यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायु विषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेले आहे.
2009 ते 2014 या काळात बैस हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते.
2014 ते 2019 या काळात 16 व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. बैस यांनी दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयकासंदर्भात व्यापक संशोधन व अध्ययन केले आहे.
2019 साली बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. 29 जुलै 2019 ते 13 जुलै 2021 या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर दिनांक 14 जुलै 2021 रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली.