संपादक:- विष्णू चव्हाण
*मुंबई:-कोरोनाची साथ पसरून रुग्ण वाढण्याच्या भीतीने केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही आपली यंत्रणा सतर्क करतानाच उपायांची तयारी सुरू केली आहे.’सध्या मास्क बंधनकारक नसले; तरी कोरोनाच्या संशयित रुग्णांनी आणि लक्षणे आढळणाऱ्यांनी मास्क वापरण्याचे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.*
*👉🟥🟥👉त्याचवेळी ही साथ आटोक्यात ठेवण्यासाठी संशयित रुग्णांच्या चाचण्या त्यातही ‘आरटीपीसीआर’ला प्राधान्य देण्याची सूचना सरकारने आरोग्य यंत्रणांना दिल्या आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पुढच्या काही दिवसांत रुग्ण आणखी वाढण्याचा अंदाज आहे. मात्र, संशयित व्यक्तींच्या चाचण्यापासून सर्व प्रकारची उपचार सुविधा वेळेत देऊन खबरदारी घेण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.त्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासोबतच रुग्णांवर लक्ष ठेवून सार्वजनिक ठिकाणी काळजी घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच यांना लक्षणे जाणवत आहेत, अशा व्यक्ती मास्क वापरून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तूर्त मास्क बंधनकारक नसला तरी, गर्दीच्या ठिकाणी तो वापरावा, असे सावंत यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, तज्ज्ञांसोबत चर्चा करून नव्या उपाय करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने गावपातळीपासून शहरांपर्यंत उपाययोजना करण्याचे सरकारचे नियोजन आहे.*