सध्या राज्याचा कोरोनाचे रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या दोन दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे.सध्या राज्याचा कोरोनाचे रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत आहेतगेल्या दोन दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बैठक बोलावली होती.*
*👉🟥🟥👉आज पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी देशातील कोविड-१९ च्या स्थितीबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. या दरम्यान, कोविड चाचणी आणि जीनोम सिक्वेन्सिंगसह, खालील कोविड नियमांचा प्रसार वाढविण्यावर चर्चा झाली. दिल्लीत ही बैठक सुरू होती.*
*👉🟥🟥👉केंद्रीय आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले की, आपण सतर्क राहायला हवे आणि विनाकारण भीती पसरवू नये. त्यांनी सर्व आरोग्य मंत्र्यांना कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या राज्यातील आरोग्य सुविधा आणि पायाभूत सुविधांबाबत आढावा बैठक घेण्याची विनंती केली. यादरम्यान त्यांनी १० आणि ११ एप्रिल रोजी संपूर्ण देशात कोविड संदर्भात मॉक ड्रिल आयोजित करण्याबाबत सांगितले. यासोबतच त्यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांनाही रुग्णालयांना भेट देण्यास सांगितले आहे.*
*👉🔴🔴👉तसेच समोर आलेल्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्य सरकारांना कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता त्यांच्या स्तरावर तयारी मजबूत करण्यास सांगितले. ते म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत लोकांना जागरूक केले पाहिजे आणि लोकांनी त्याबाबत हलगर्जीपणा करू नये. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ६ एप्रिलच्या कोरोना प्रकरणांच्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ५,३३५ रुग्ण आढळले आहेत. हा आकडा गेल्या १९५ दिवसांतील उच्चांक आहे. यापूर्वी, गेल्या वर्षी २३ सप्टेंबर रोजी ५,३५३ प्रकरणे नोंदवली गेली होती. यासह, देशातील सक्रिय प्रकरणांची संख्या २५,५८७ झाली आहे.*