संपादक:- विष्णू चव्हाण
इंदापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय हे पुणे जिल्ह्यातील एक उत्कृष्ट इमारत आणि इंदापूर उपजिल्हा रुग्णालय हे उपचारासाठी एक वेगळी ओळख होती पण आता सध्या गेली काही दिवसापासून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून आजच्या स्थितीला इंदापूर उपजिल्हा रुग्णालय हे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेसाठी ओळखले जात आहे.
करमाळा, टेंभूर्णी, इंदापूर तालुक्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी इंदापूर उप जिल्हा रुग्णालयात येत असतात पण गेली काही वर्षांपासून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील अनेक विभाग धुळखात बंद आहे.महिलांसाठी अनेक लागणार्या मिशनरी असून सुद्धा कर्मचारी नसल्याने बंद आहेत.कि, जाणूनबुजून खाजगी दवाखान्याच्या फायद्यासाठी बंद ठेवल्या आहेत.की, कर्मचारी भरला जात नाही.सरकारने पाच लाखांपर्यंत आजारांवरील खर्च मोफत केला असून त्याला केराची टोपली दाखवली आहे.डॉक्टर वेळेवर येत नाहीत सतत गैरहजर मात्र पगार फुल घेतला जातोय.
*भुलतज्ञ व डॉक्टर उपलब्ध नाही म्हणून डिलिव्हरी करण्यासाठी टाळा*
इंदापूर तालुक्यातील वडापुरी व इतर गावांतील दोन गरोदर महिला डिलिव्हरी आल्यासाठी तेथील उपस्थित नर्स किंवा डॉक्टरांनी सांगितले की, डिलिव्हरी करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नाही. भूलतज्ञ उपलब्ध नाही. तुम्ही बारामतीला जावा किंवा सुसनला जावा, सोलापूरला जावून डिलिव्हरी करा. बाळ काच ठेवावे लागेल अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात आणि मग गोर गरीबांची महिला ,नागरिक घाबरून कर्ज काढून, आपल्या जवळचे किडूकमिडूक सोनाराकडे गाणं ठेवून किंवा मोडून खाजगी दवाखान्यात जातात आणि तिथे मग सिझर डिलिव्हरी होते .
सरकारी दवाखान्यातील संबंधित आणि खाजगी दवाखान्याचे लागेबंधे असून कमिशन, टक्केवारी प्रकार घडत आहे अशी सामान्य नागरिका आणि इंदापुरात चर्चा आहे. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये एवढ्या मोठे ऑपरेशन थिएटर सुविधा असताना अशी कारणे का सांगितले जातात? आणि इंदापूरच्या गरोदर मातेला बारामती, सुसून, सोलापूर सारख्या ठिकाणी पाठवले जाते. इंदापूर तालुक्यातील डॉक्टर नेमके काय करतात? कितीतरी स्त्रीरोग तज्ञ असताना इंदापूर मध्ये भुलतज्ञ मिळत नाही याच्या मागचं गुढ काय आणि गुढ मागचे कारणांचा शोध लावणार का असावा सवाल उपस्थित होत आहे.
*मनुशबळ कमी आहे, डॉक्टर काम करत नसल्याने वरिष्ठांचा कांगावा की,…मुजबरी ?”
सध्या इंदापूर तालुक्याच्या उपजिल्हा रुग्णालयात गेल्या काय वर्षात काही डॉक्टरांनी चांगल्याप्रकारे कामगिरी करून नावलौकिक मिळवून गेले. पण इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात मनुष्यबळ कमी आहे, डॉक्टर आहेत पण वेळेवर येत नाहीत, कामच करत नाहीत असा वरिष्ठांकडून उत्तरे दिले जातात की, जाणूनबुजून कांगावा केला जातोय का? मजबुरी आहे. वरिष्ठांचे नेमके के डॉक्टर आदेश पाळत नाहीत. आदेश पायदळी तुडवून मनमानी कारभार करतात अशी एक ना बारा चर्चा इंदापूर तालुक्यात सुरू आहे. हलगर्जीपणा करणारे संबंधित उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवर फौजदारी मनुष्यवधाचा स्वरूपाचे गुन्हा दाखल करावा. संबंधित सरकारी डॉक्टर, कर्मचारी आणि खाजगी दवाखान्याशी कुणाचे लागेबंधे असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. डॉक्टर काम करत नसतील तर त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.