*सिंधुदुर्ग:-(कोकणचा तडाखा न्यूज):-राज्यसभेच्या खासदारांना लोकसभेत पाठविण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. कदाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुद्धा लोकसभेचं तिकीट द्यायची मोदींची योजना असू शकते.राणे जर निवडणुकीच्या रिंगणात असतील तर ते नक्कीच विजय होतील, कारण त्यांच्याबद्दल कोकणी जनतेच्या मनात आत्मीयता आहे आणि याचा फायदा राणेंना होऊ शकतो. ते उमेदवार असतील तर त्यांना शंभर टक्के पाठिंबा असेल असं मत व्यक्त करताना राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार असू शकतील अशा पद्धतीचे संकेत गुरुवारी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत येथे दिले.*
*👉🟥🟥👉उद्धव ठाकरे माझ्या सावंतवाडी मतदारसंघात येत असतील तर त्यांनी मला मुंबईला येण्याचं निमंत्रण दिलं आहे असे मी मानतो. अशा पद्धतीचा इशारा दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिलाय. उद्धव ठाकरे यांचा आजपासून कोकण दौरा सुरू झालाय व ते 4 फेब्रुवारीला सावंतवाडीत येणार आहेत या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी हा इशारा दिलाय. ते म्हणाले फक्त टीका करण्यासाठी कोकण दौरा नको तर आपण काय केलं ते पण जाहीर करा असं आवाहनही त्यांनी यावेळी दिलय.अर्थसंकल्पात फक्त आर्थिक तरतूद करून चालत नाही तर त्याच आर्थिक नियोजन करायवं लागतं. तेच मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात केलं आहे. जे टीका करतात त्यांनी इतकी वर्ष का विकास केला नाही. मोदी सरकारच्या काळात देश अकराव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोचू शकला हेच मोदी सरकारचं यश आहे. त्यामुळेच आजचा जो अर्थसंकल्प आहे तो समाधानकारक आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.*