राज्यभरातील पत्रकारांनी तालुका-जिल्हास्तरावर सरकारचा निषेध केला, निदर्शने केली. विरोधी पक्षांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले.👉🔴🔴👉 त्यामुळेच अडचणीत आलेल्या गृहमंत्र्यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली.*
*मुंबई – शशिकांत वारिसे हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. हे नीच कृत्य असून याबदद्ल आरोपीला शिक्षा झाली पाहिजे असे ते म्हणाले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्षवेधीद्वारे शशिकांत वारिसे हत्याप्रकरणाचा मुद्दा सदनात उपस्थित केला होता.*
*👉🟥👉अजित पवार यांनी सदर प्रकरणी बोलताना या हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीवर दबाव येऊ देऊ नका. तपास पारदर्शकपणे होऊ द्या अशी मागणी केली होती. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी कोणत्याही दबावाखाली काम करू नये असे आदेश देण्यासंदर्भात मी स्वत: पोलीस महासंचालकांशी बोलेन.बारसू-सोलगावमध्ये रिफायनरीला विरोध असतानादेखील सरकार अजूनही इथे रिफायनरी आणण्यावर ठाम आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही ही रिफायनरी करू. रिफायनरी राज्याच्या हिताची असून त्यासाठी सरकार पाठपुरावा करणार आहे असे फडणवीस यांनी त्यांच्या उत्तरात सांगितले. रिफायनरी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मदत देणारी ठरेल असं म्हणत त्यांनी या रिफायनरीची पाठराखण केली.*
*👉🟥👉‘महानगरी टाइम्स’चा पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या झाल्यानंतर रत्नागिरीतलच नव्हे तर अवघ्या राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल प्रेस कौन्सिलनेही घेतली आणि राज्य सरकारकडून अहवाल मागवला होता. राज्यभरातील पत्रकारांनी तालुका-जिल्हास्तरावर सरकारचा निषेध केला, निदर्शने केली. विरोधी पक्षांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे अडचणीत आलेल्या गृहमंत्र्यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली आणि अटकेत असलेल्या आरोपी आंबेरकरवर हत्येच्या गुन्ह्याचे कलम लावले.*