सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या नंदूरबारहून मुंबईकडे पायी निघालेल्या मोर्चाच्या शिष्टमंडळाने आज रात्री देवगिरी निवासस्थान, नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा केली. यातील बहुतेक मागण्यांबाबत सचिवांना तत्काळ निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच 1 महिन्यात मुंबई येथे आढावा बैठक घेण्यात येईल, असे सुद्धा सांगितले. हा मोर्चा सद्या नाशिक येथे थांबला आहे. राज्य सरकार या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याने आता हा मोर्चा नाशिक येथेच विसर्जित करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चेकऱ्यांना केले.