प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू राष्ट्राला समर्पित करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.