संपादक:- विष्णू चव्हाण
मुरबाड पोलीसांनी गत दोन वर्षात केलेल्या चांगल्या कामगिरीत आणखीन एक माणुसकी जपणारी कामगिरी केल्याने सगळे मुरबाड भावनेने गहिवरले व मुरबाड पोलीसांचे कौतुक होत आहे.
दिनांक २/१/२४ रोजी मुरबाड पोलीसांना रात्री माहिती मिळाली किं एक ५०/५५ वर्षे वयाची महिला ग्राम आंबेगाव पो. म्हसा ता. मुरबाड गावी आली आहे तिची भाषा कळत नाही व तिला गावकाऱ्यांची भाषा कळत नाही पोलीस मदत हवी आहे.
सदरची माहिती मिळताच मुरबाड पोलीसांनी त्वरित प्रतिसाद देवून पोलीस वाहनासह तिथे पोहचून सदर महिलेस सुरक्षित पणे ताब्यात घेवून तिचे नाव, गाव बाबत माहिती घेतली असता ती महिला
“” तेलंगणा राज्य””
येथील असल्याचे समजले तिला केवळ तेलगु भाषा येत असल्याने तेलगु भाषेचे ज्ञान असलेले Asi. कोणकी यांनी त्यांनां विश्वासात घेवून माहिती घेतली असता सदर महिलेचे नाव श्रीमती शामला सन्तोष रेड्डी वय:-५२ वर्ष राहणार:- अपंग पट्टनम नवा पेठ राज्य:- तेलंगणा येथिल असल्याचे समजले त्या वरून मुरबाड पोलीसांनी त्वरित गुगल वरून तेलंगणा येथील नवापेठ पो स्टेशनचा नंबर मिळवून सदर महिले बाबत माहिती दिली असता सदर महिले बाबत त्या pstn ला हरवल्याची तक्रार (missing) नोंद असल्याचे समजले त्यांचे नातेवाईक घेवून तेलंगणा पोलीस मुरबाडला येत आहेत. ते येई पर्यंत सदर महिलेस सखी वन स्टॉप सेंटर उल्हासनगर येथे सुरक्षित ठेवले आहे.
ही कामगिरी मुरबाड पो स्टे, api.जाधव, Asi. नरसीमल्लू कोणकी, pn.राहुल गावडे,Pn. धनराज देवरे, pn. प्रदीप उबाळे,pc. रामदास काळे,pc. संदेश खोमणे,महिला पोलीस योगीता भोईर यांनी केली आहे.
मुरबाड पोलीसांच्या ह्या माणुसकी जपणाऱ्या कामगिरी मुळे हरवलेल्या निराधार महिलेची भटकंती संपली व तिला आपल्या आप्त नातेवाईका पर्यंत पोहचन्याचा मार्ग मोकळा झाला आहे ह्या भावनिक कामगिरी मुळे मुरबाड पोलीसांचे संपूर्ण मुरबाड मध्ये कौतुक होत आहे.
(प्रसाद पांढरे)
वपोनि
मुरबाड पो ठाणे